मुखपृष्ठ

अलीकडील पोस्ट

मुंबईतील एकमेव सूर्य मंदिर

दक्षिण मुंबईत असलेला भुलेश्वर परिसर वस्तू खरेदी करणाऱ्यांसाठी अलिबाबाची गुहा आहे. चांगल्यातील चांगली वस्तू कितीही महाग असू दे, भावाची घासाघीस करण्याचे कौशल्य असेल तर अगदी स्वस्तात पदरात पडते. त्यामुळे हा परिसर ग्राहक आणि विक्रेत्यांनी कायम गजबजलेला असतो. भुलेश्वर मार्केटच्या आजूबाजूला कपड्यांसाठी मंगलदास मार्केट, फळभाज्यांसाठी क्राफर्ड मार्केट, दागिन्यांसाठी झवेरी बाझार इ. महत्वाच्या बाजारपेठा आहेत. भुलेश्वरच्या खाऊगल्लीची … मुंबईतील एकमेव सूर्य मंदिर वाचन सुरू ठेवा

मुंबईतील दीपगृहे

समुद्रसफरी करणाऱ्या जहाजांचा भरवशाच्या साथीदार म्हणजे दीपगृह. किनाऱ्यावरील जमीन, खडक यांची माहिती जहाजांना व्हावी हा दीपगृहाचा मुख्य उद्देश. सुरुवातीच्या काळात उंच जागेवर लाकडाच्या जाळाचा किंवा पेटलेल्या कोळशांच्या राशीचा वापर करण्यात येत असे. किनारा दिसण्याकरता, धोका दर्शवणे, एका बंदरातून दुसऱ्या बंदरात जाताना मार्गदर्शक म्हणून, सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी आणि बंदरांची सीमा दाखवणे इ. दीपगृहांची मुख्य कामे. अत्याधुनिक … मुंबईतील दीपगृहे वाचन सुरू ठेवा

जंगल सत्याग्रह व चिरनेर गाव

१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे उरण तालुक्यातील चिरनेर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नकाशावर आले. या परिसरात आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी इ. लोकांचे प्राबल्य होते आणि बहुसंख्य ग्रामस्थांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय. इंग्रजांनी २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर, कळंबसुरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे इ. गावातील गावकऱ्यांना जंगलातील लाकडे तोडण्यास मनाई केली. गावकऱ्यांनी … जंगल सत्याग्रह व चिरनेर गाव वाचन सुरू ठेवा

मुंबईतील कारंजी

ब्रिटिशकाळात मुंबईत सुमारे ५० फाऊंटन होती. मुंबईच्या सौंदर्यात फाउंटन भर घालतात. यातील अनेक फाउंटन स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेली आहेत. काही फाउंटन बांधण्यासाठी लोकवर्गणीतून पैसा उभा करण्यात आला. मुंबईत फाउंटन बांधण्याची सुरुवात गव्हर्नर सर बार्टल फ्रियर (सन १८६२ – १८६७) यांच्या कार्यकाळात झाली. वेलिंग्टन फाउंटन हे मुंबईतील पहिले फाऊंटन. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हे फाउंटन आहे. हे फाउंटन … मुंबईतील कारंजी वाचन सुरू ठेवा

More Posts